Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण?

महापालिकेचे हात वर, म्हाडा आणि पोलिस करणार का कारवाई

2424
Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण?
Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण?

मुंबईतील डोंगरी परिसरात (Dongri Unauthorized Building) लक्ष्मी इमारतीत (Lakshmi building) पुनर्रचनेच्या नावाखाली अनधिकृत मजले चढवले जात असून म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. म्हाडाच्या (Mhada) अधिकाऱ्यांच्या अभयाखाली डोंगरीत इमारतींवर (Dongri Unauthorized Building) अनधिकृत मजले चढवले जात असतानाच या अनधिकृत इमारतींकडे (Building) दुर्लक्ष करण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत. त्यातून चार मजली लक्ष्मी इमारत (Lakshmi building) ही सात मजल्यांची बनल्यानंतरही म्हाडाच्या (Mhada) अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी या अनधिकृत इमारतीमध्ये (Building) बाग्लादेशी मुसलमान राहत असल्याचा थेट आरोप केल्यामुळे आता म्हाडाचे (Mhada) इमारत दुरुस्ती मंडळ या इमारतींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Dongri Unauthorized Building)

न्यायालयाचे बांधकाम पाडायचे आदेश तरीही…

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी डोंगरी भागातील हिंदु कुटुंबाच्या चार मजली लक्ष्मी इमारतीत घुसखोरी करून वरील ९ मजले अनधिकृत बांधले असल्याचे सांगत या बांगलादेशी घुसखोरी विरोधात राणे यांनी पोलिस (Police) आणि महापालिका अधिकाऱ्यांची भेट देऊन त्वरीत कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती एक्स या सामाजिक माध्यमावर दिली आहे. न्यायालयाचे बांधकाम (construction) पाडायचे आदेश असताना वरील अनधिकृत मजल्यांसह इमारत (Building) उभी आहे. या इमारतीत राहणारे बांगलादेशींचे कोणतेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाही. देशविघातक शक्ती येऊन अशा इमारतीत राहून कायदा सुव्यवस्था बिघडवू शकतात, असे निदर्शनास आणले असल्याचे नितेश राणे यांनी एक्सवर स्पष्ट केले आहे. (Dongri Unauthorized Building)

(हेही वाचा- Educational Qualification : चांगल्या करियरसाठी शैक्षणिक पात्रता कशी वाढवावी ?)

म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाच्या परवानगीनुसारच

नितेश राणे (Nitesh rane) यांच्या निवेदनाची प्रत महापालिका (BMC) आयुक्तांनी म्हाडाला वर्ग केली आहे. या इमारती सेस असल्याने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्यावतीने भाडेकरू आणि विकासकाला पुनर्रचनेसाठी परवानगी दिली जाते. दुरुस्ती मंडळाच्या परवानगीनुसारच या इमारतींची दुरुस्ती तसेच पुनर्रचना केली जाते. मात्र, या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेला (BMC) कोणतेही अधिकार नसून या इमारतीच्या अनधिकृत मजल्यांवर किंवा अनधिकृत बांधकामांवर (construction) कारवाईसाठी मनुष्यबळ व साहित्यांची मागणी केल्यास महापालिकेच्यावतीने (BMC) म्हाडाच्या या मंडळाला उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अनधिकृत बांधकामाला म्हाडाच्या (Mhada) इमारत दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे स्पष्ट होत असून आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी अनधिकृत बांधकामाबाबत केलेल्या तक्रारीनुसार म्हाडा (Mhada) या वाढीव बांधकामावर तसेच पोलिस येथील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Dongri Unauthorized Building)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.