Ranibaug Pushpotsaw : राणी बागेत पुष्पोत्सव: फुलझाडांसह फळभाज्यांच्या खरेदीला झुंबड

2007
Ranibaug Pushpotsaw : राणी बागेत पुष्पोत्सव: फुलझाडांसह फळभाज्यांच्या खरेदीला झुंबड
Ranibaug Pushpotsaw : राणी बागेत पुष्पोत्सव: फुलझाडांसह फळभाज्यांच्या खरेदीला झुंबड
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून राणी बागेत आयोजित केलेल्या पुष्पोत्सवात विविध रंगांच्या फुलांना फोटोत टिपण्यासाठी आणि फुलझाडांसह फळभाज्यांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या कार्टून कॅरॅक्टर्सच्या फुलांपासून बनवलेल्या प्रतिकृतीसोबत सेल्फी काढण्यासाठी विशेष गर्दी झाली होती. या पुष्पोत्सवाला विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींसह सुमारे दीड लाखांहून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या भेट दिल्याची नोंद झाली आहे. (Ranibaug Pushpotsaw)

या प्रदर्शनाला जपान, मलेशिया, कॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश मंजुषा देशपांडे, अभिनेता रणजित, पवन मल्होत्रा, एकता जैना, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसेकर आदी दिग्गजांनीही भेट दिली. प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने याठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली. (Ranibaug Pushpotsaw)

(हेही वाचा – Military : लष्कराच्या “शौर्य संध्या’ कार्यक्रमाचा समारोप; तीन दिवसांत १ लाख नागरिकांनी दिली भेट)

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली आयोजित या उपक्रमाला नागरिक आणि पर्यटकांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला आहे. (Ranibaug Pushpotsaw)

यंदाच्या पुष्पोत्सवासाठी ‘ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने हत्ती, वाघ, झेब्रा, अस्वल आदी प्राण्यांच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, रंगबेरंगी फुलझाडे, वनस्पती औषधी आदींचा समावेश होता. यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला. पाना-फुलांपासून साकारलेले उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ साकारण्यात आलेले ‘चांद्रयान’ विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. (Ranibaug Pushpotsaw)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.