Rain Update : मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’; वाचा…पावसाविषयी हवामान विभागाचा अंदाज

राज्यात सध्या पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

149
Rain Update : मराठवाडा, विदर्भात 'यलो अलर्ट'; वाचा...पावसाविषयी हवामान विभागाचा अंदाज
Rain Update : मराठवाडा, विदर्भात 'यलो अलर्ट'; वाचा...पावसाविषयी हवामान विभागाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (Rain Update ) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळमध्ये जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवाचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ईशान्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात सध्या पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

(हेही वाचा – Pune MNS : पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर केली दगडफेक)

वेगाने वारे आणि विजांसह पावासाचा इशारा
यामुळे शुक्रवार, १ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे आणि विजांसह पावासाचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाची शक्यता
2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.