Virat Kohli London Holiday : विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर लंडनमध्ये अशी घालवतोय सुट्टी

एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर विराट कोहलीने सुट्टीसाठी पत्नी आणि मुलीबरोबर थेट लंडन गाठलं आहे. तिथले काही फोटो व्हायरल झाले आहेत. 

150
Virat Kohli London Holiday : विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर लंडनमध्ये अशी घालवतोय सुट्टी
Virat Kohli London Holiday : विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर लंडनमध्ये अशी घालवतोय सुट्टी
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर विराट कोहलीने सुट्टीसाठी पत्नी आणि मुलीबरोबर थेट लंडन गाठलं आहे. तिथले काही फोटो व्हायरल झाले आहेत. (Virat Kohli London Holiday)

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाबरोबर टी-२० मालिका खेळतोय. पण, यात एकदिवसीय विश्वचषकात खेळलेल्या बहुतेक खेळाडूंनी विश्रांतीच घेतली आहे. त्यातच विराट आणि रोहित यांनी तर आपल्या वयाला अनुसरून टी-२० क्रिकेटच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही दोघं टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार नाहीएत. (Virat Kohli London Holiday)

अशावेळी सध्या हे दोघं काय करतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर दोघं आपल्या कुटुंबाला वेळ देतायत आणि विराट कोहली तर पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर युकेमध्ये आहे. कोहलीने तिथे काही चाहत्यांबरोबर फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. तर चाहत्याने टाकलेल्या एका व्हिडिओत अनुष्का मुलगी वामिकाबरोबर खेळताना दिसतेय. (Virat Kohli London Holiday)

(हेही वाचा – Pune MNS : पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर केली दगडफेक)

असेच आणखी काही फोटोही सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराटने टी-२० खेळणं कमीच केलं आहे. पण, आफ्रिका दौऱ्यावर त्याने एकदिवसीय मालिकेतूनही माघार घेतली आहे आणि हा सुट्टीचा काळ तो आपल्या कुटुंबाबरोबर दूर युकेमध्ये तिथल्या थंडीत घालवताना दिसतोय. (Virat Kohli London Holiday)

सुटीनंतर मात्र विराट कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. त्यानंतरचा भारतीय संघाचा कार्यक्रमही बऱ्यापैकी व्यस्त आहे आणि भारतीय संघ मायदेशात इंग्लंडबरोबर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. (Virat Kohli London Holiday)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.