Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी पोलिस तैनात

पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या ४५० किलोमीटर अंतरापर्यंत महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील १९ अधिकारी आणि २२६ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात आहेत.

16
Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी पोलिस तैनात
Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी पोलिस तैनात

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी (१९ सप्टेंबर) होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. गणेशोत्‍सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, कोणतेही विघ्न येऊ नये, वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत. पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या ४५० किलोमीटर अंतरापर्यंत महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील १९ अधिकारी आणि २२६ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात आहेत.
त्‍सवासाठी गणेशभक्त लाखोंच्या संख्येने खासगी, सावर्जनिक वाहनांनी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करत कोकणात दाखल होतात. त्‍यांचा प्रवास निर्विघ्‍न व्हावा, यासाठी खेड तालुक्यातील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तर पळस्पे फाट्यापासून इंदापूरपर्यंत एकेरी रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्‍याने या मार्गावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, गुजरातमधून गावी जाणारे प्रवासी आपली वाहने याच मार्गावरून नेऊ शकतील.
जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर आणि कोलाड या ठिकाणी लोणेरे फाटा दरवर्षी वाहतूक कोंडी होते. यंदा प्रशासनाने कोंडीला सोडवण्यासाठी आतापासून तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-भरणा नाका, चिपळूण शहराजवळील बहादूर शेख नाका या दोन ठिकाणीही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्‍याने वाहतूक पोलिस तैनात आहेत.महामार्ग वाहतूक पोलिस शाखेच्या पळस्पे फाटा, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबा, कसाल अशा सात शाखा असून १९ अधिकारी आणि २२६ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एखादा अपघात झाला तर जखमींसाठी रुग्णवाहिका तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेनही सज्‍ज आहेत.

(हेही वाचा : Asia Cup 2023 Final : आशिया कपकडे प्रेक्षकांची पाठ; अंतिम सामन्यासाठी केवळ १०% प्रेक्षक उपस्थित राहणार)
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षतेच्या दृष्टीने शक्‍यतो दिवसा प्रवास करावा. वेग मर्यादेवर नियंत्रण ठेऊन वाहन चालवावे. प्रवासात अडचण निर्माण झाल्यास जवळच्या वाहतूक शाखेत संपर्क साधावा किंवा अडचणीच्या परिस्थितीमध्ये ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.
गणेशोत्सव काळात महामार्गावर ४०० हुन अधिक पोलिस
गणेशोत्सव काळात तीन दिवस महामार्गावर ४०० हुन अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, वेगमर्यादा पाळावी, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी चालकांना करण्यात आले आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी महामार्गावर १० सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून, जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.