Qatar Indian Ex Navy Officers : कतारच्या तुरुंगातून ८ माजी नौसैनिकांची सुटका, ७ सैनिक मायदेशी परतले

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते.

512
Indian Navy: सागरी क्षेत्रातील धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाने राबवली १०० दिवसांची मोहीम, वाचा सविस्तर...

हेरगिरीच्या आरोपाखाली कतारच्या तुरुंगात (Qatar Indian Ex Navy Officers) असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी सैनिकांची सुटका करण्यात आली आहे, असे सरकारने सोमवार १२ फेब्रुवारी रोजी पहाटे सांगितले. त्यापैकी सात जण मध्य-पूर्व देशात १८ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर मायदेशी परतले आहेत. या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. मात्र भारताच्या मुत्सुद्देगिरीला मोठं यश मिळालं असून त्या सैनिकांची सुटका करण्यात आली आहे.

(हेही वाचा – NIA Raid in Tamil Nadu : तमिळनाडूत NIAचे 21 ठिकाणी छापे; मोबाईल, हार्डडिस्क जप्त)

माजी नौदल अधिकारी भारतात परतले –

भारताच्या विनंतीवरून, कतारच्या अमीरनं आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा आधीच कमी केली होती आणि त्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं होतं. आता परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, त्या आठही नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली असून यापैकी सात माजी नौदल (Qatar Indian Ex Navy Officers) अधिकारी भारतात परतले आहेत.

(हेही वाचा – Narendra Modi: भारतीय मूल्यांमध्ये रुजलेली शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज – पंतप्रधान मोदी)

परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार,

“कतारमध्ये (Qatar Indian Ex Navy Officers) अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचं भारत सरकार स्वागत करतं. या आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. आम्ही या नागरिकांच्या सुटकेची आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या कतार राज्याच्या अमीरच्या निर्णयाचं कौतुक करतो.”

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते. (Qatar Indian Ex Navy Officers)

(हेही वाचा – Political parties in the state : राज्यातील राजकारण नव्या दिशेने!)

नेमका प्रकार काय ?

ते दहरा ग्लोबल या खाजगी संस्थेत कार्यरत होते आणि कतारच्या अमिरी नौदल दलात (Qatar Indian Ex Navy Officers) त्यांच्या वैयक्तिक भूमिकांमध्ये इटालियन यू212 गुप्त पाणबुड्या आणण्यात मदत करण्यासाठी ते कतारमध्ये होते.

कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे आपल्याला मोठा धक्का बसला असून सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत असल्याचे भारताने म्हटले होते. त्यानंतर भारताच्या राजनैतिक हस्तक्षेपामुळे डिसेंबरमध्ये फाशीची शिक्षा कमी करण्यात आली. (Qatar Indian Ex Navy Officers)

(हेही वाचा – Gyanvapi Case : हे पहा पुरावे… ज्ञानवापी हे हिंदूंचे मंदिरच!)

आम्ही पंतप्रधान मोदींचे अत्यंत आभारी आहोत – माजी नौदल अधिकारी

“आम्ही सुरक्षितपणे भारतात परतलो याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही नक्कीच पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो कारण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे शक्य झाले. आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ १८ महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारबरोबरच्या त्यांच्या समीकरणाशिवाय हे शक्य झाले नसते. भारत सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नाबद्दल आम्ही सरकारचे मनापासून आभारी आहोत. त्यांच्या प्रयत्नांशिवाय हा दिवस शक्य झाला नसता “, असे माजी नौदल (Qatar Indian Ex Navy Officers) अधिकारी यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.