Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश, भारत सरकारचा युनेस्कोकडे प्रस्ताव

गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५मध्ये नामांकन मिळाले आहे.

179
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश, भारत सरकारचा युनेस्कोकडे प्रस्ताव
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश, भारत सरकारचा युनेस्कोकडे प्रस्ताव

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशाकडून नामांकने पाठवली जात असतात. यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज यादी २०२४-२५ करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा ‘मराठा रणभूमी’ला नामांकन दिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे तसेच तामिळनाडूतील जिंजीचा किल्ल्याचाही समावेश आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत ट्विटर ‘X’वरून माहिती दिली.

पहिली पायरी सर…

शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप!

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या अधिकृत ‘x’ अकाउंटवर म्हटले आहे की, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड-किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५मध्ये नामांकन मिळाले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना नामांकन मिळाल्याने पहिली पायरी सर झाली आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, अशी मला खात्री वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय महाराष्ट्र!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.