Gyanvapi Case : हे पहा पुरावे… ज्ञानवापी हे हिंदूंचे मंदिरच!

Gyanvapi Case : मशिदीच्या बांधकामाशी संबंधित शिलालेखात चिन्हांकित केलेली वेळ मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे अनेक पुरावे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आले आहेत.

280
Gyanvapi Case : हे पहा पुरावे... ज्ञानवापी हे हिंदूंचे मंदिरच!
Gyanvapi Case : हे पहा पुरावे... ज्ञानवापी हे हिंदूंचे मंदिरच!

काशी विश्वनाथ मंदिराच्या भूमीवर उभारलेल्या ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (Archaeological Survey of India) केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा न्यायालयाने पक्षकारांकडे सुपूर्त केला. या अहवालात सापडलेल्या पुराव्यांचा तपशील… (Gyanvapi Case)

(हेही वाचा – Narendra Modi: भारतीय मूल्यांमध्ये रुजलेली शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज – पंतप्रधान मोदी)

New Project 2024 02 11T214008.452

 1. मशिदीच्या आधी बांधण्यात आलेल्या मंदिरात एक मोठे मध्यवर्ती सभागृह आणि उत्तरेला एक छोटे सभागृह होते.
 2. १७ व्या शतकात हे मंदिर पाडण्यात आले आणि त्याचा काही भाग मशिदीत समाविष्ट करण्यात आला. (Varanasi)
 3. मशिदीच्या बांधकामात मंदिराचे खांब, तसेच इतर अवशेष फारसे बदल न करता वापरले गेले.
 4. काही खांबांवरून हिंदू चिन्हे काढून टाकण्यात आली आहेत.
 5. मशिदीची पश्चिमेकडील भिंत पूर्णपणे हिंदू मंदिराचा भाग आहे. (Hindu Temples)
 6. सर्वेक्षणात ३२ शिलालेख आणि दगड सापडले आहेत. ते तेथील पहिल्या हिंदू मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत.
 7. हे शिलालेख देवनागरी, तेलगू आणि कन्नड भाषेत आहेत.
 8. एका शिलालेखात जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे लिहिले आहे, तर दुसऱ्या शिलालेखात ‘महामुक्ति मंडप’ असे लिहिले आहे.
 9. मशिदीच्या अनेक भागांमध्ये मंदिराच्या रचना सापडल्या आहेत.
 10. मशिदीच्या बांधकामाशी संबंधित शिलालेखात चिन्हांकित केलेली वेळ मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Gyanvapi Case)

  हे भग्न अवशेष स्पष्ट सांगतात, येथे मशीद नव्हे, तर मंदिरच होते !

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.