PM Narendra Modi यांचा नाशिक दौरा; वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन. या मोहिमेत ८८,००० हून अधिक स्वयंसेवक होणार सहभागी, स्वयंसेवकांमार्फत होणार सरकारी योजनांच्या माहितीचा प्रचार

157
Modi Govt च्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड; विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील. यावर्षी, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने भारतभरातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत ८८,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – Clean Survey 2023: महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर)

याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळं शहरातील (PM Narendra Modi) नागरिकांना बदललेल्या मार्गांनी प्रवास करावा लागणार असून या प्रवासासाठी त्यांना जास्तीचा वेळही लागण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती आणि सूचनांनुसार शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ६ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत वाहतूक बदलांचे हे नियम लागू असणार आहेत.

(हेही वाचा – Passport Ranking: पासपोर्ट क्रमवारीत भारत ८०व्या स्थानी, कोणत्या देशातील नागरिक व्हिसाशिवाय किती देश फिरू शकतात; वाचा सविस्तर)

‘या’ मार्गांवरील वाहतूक बंद राहणार

१. काळाराम मंदिर ते नाग चौक, काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग

२. सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे दोन्ही बाजूंचा मार्ग (ये-जा करणार रस्ता) मार्ग

३. मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत दोन्ही बाजूंचा मार्ग मार्ग

४. तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग

५. दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग

६. टाकळी गाव, काठे चौकाकडून सिदधीविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग

७. सितागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग

८. लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवन दिशेनं जाणारा मार्ग

९. निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनच्या दिशेनं जाणारा मार्ग

१०. बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग

(हेही वाचा – Ram Mandir: राम लल्ला मंदिर परिसरात यजुर्वेद पठणाला सुरुवात, १२१ वेदपतींना आमंत्रण)

११. नांदूरनाका ते तपोवनकडे येणारा मार्ग

१२. रासबिहारी ते निलगिरी बागकडे येणारा मार्ग

१३. स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग

१४. काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंटकडे जाणारा मार्ग

१५. अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग

१६. जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग

१७. संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकीकडे जाणारा मार्ग

१८. तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.