Sudhanshu Trivedi : ‘कारसेवकांवर गोळीबार करणारे देखील येत आहेत, पण … – भाजपची काँग्रेसवर टीका

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते उपस्थित नसल्याबद्दल भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस स्वतःला बदलू शकली असती, पण पक्षाने तसे केले नाही. ही नेहरूंची काँग्रेस आहे. ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. काँग्रेस नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात आहे.

191
Sudhanshu Trivedi : 'कारसेवकांवर गोळीबार करणारे देखील येत आहेत, पण ... - भाजपची काँग्रेसवर टीका

अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण सुरु आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाकडून सोहळ्याच्या निमंत्रणाचे आमंत्रण फेटाळण्यात आले आहे. यावरून भाजप पक्ष (Sudhanshu Trivedi) आक्रमक झाला असून त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण तुम्हाला (काँग्रेस) पाठवण्यात आले होते, परंतु काही कट्टर मतांसाठी तुम्ही ते निमंत्रण नाकारले.” असा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली.

(हेही वाचा – Ram Mandir: राम लल्ला मंदिर परिसरात यजुर्वेद पठणाला सुरुवात, १२१ वेदपतींना आमंत्रण)

नेमकं काय म्हणाले सुधांशु त्रिवेदी ?
काँग्रेसने हिंदू धर्माला विरोध दर्शवला

सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) म्हणाले की; “तुम्ही स्वतःला बदलू शकत होता, तुम्ही बदलले नाही, ही नेहरूंची काँग्रेस आहे. ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. गांधीजींच्या समाधीवर ते भगवान राम आहेत असे लिहिले आहे. त्यांनी ही संधी गमावली आहे.”

(हेही वाचा – Pawar Vs Pawar : बारामतीत सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया)

काही कट्टर वैचारिक मतांमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला-

सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) पुढे म्हणाले की, “काँग्रेसने कायमच हिंदू धर्माला आपला विरोध दर्शविला आहे. काही कट्टर वैचारिक मतांमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. ‘राम नाम कड़वा लगे और प्यारा लगे राम तो। दुविधा में दोनो गए, माया मिली न राम।’ असे त्यांनी सांगितले.

लोकही काँग्रेसला नाकारत आहेत –

काँग्रेसने नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला. काँग्रेसने जी-20 शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला. २००४ ते २००९ या काळात काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकला. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या नेतृत्वाखाली मे १९९८ मध्ये झालेल्या पोखरण अणुचाचण्यांनंतर १० दिवस काँग्रेसने कोणतेही विधान केले नाही. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न पुरस्कार सोहळ्यावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. लोकही त्यांना नाकारत आहेत.” (Sudhanshu Trivedi)

(हेही वाचा – Waste Water Treatment Plant : प्रक्रिया केलेले सांडपाणी पिण्यायोग्य; यासाठी असा बनवला जात आहे आराखडा)

भक्तांवर गोळीबार करणारे देखील उपस्थित राहणार –

कारसेवक आणि रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचेही सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी सांगितले. ते लोकही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, पण काँग्रेस या कार्यक्रमाला येणार नाही.

हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम –

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम आहे, असे म्हणत काँग्रेसने बुधवारी एक पत्र जारी केले. त्यामुळे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. (Sudhanshu Trivedi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.