Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात रत्नागिरी पोलीस दलाकडून दक्ष राहण्याचे आवाहन

61
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात रत्नागिरी पोलीस दलाकडून दक्ष राहण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाकडून दापोली, संगमेश्वर, लांजा व देवरूख या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पथसंचलन करण्यात आले. राज्यात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात विविध पक्षांच्या राजकीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत हे पथसंचलन घेण्यात आले.

या पथसंचलनामध्ये त्रिपुरा राज्यातील एसएपी (स्टेट आर्म पोलीस), सीएएफ (सेंट्रल आर्म पोलीस) तसेच जिल्हा पोलीस दलाचे आरसीपी (दंगल नियंत्रण पोलीस) व प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्यामधील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता सर्व नागरिकांना जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याचे तसेच दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – Mumbai Water Supply : मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.