PM Narendra Modi पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

124
PM Narendra Modi पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन
PM Narendra Modi पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाच्या (Inauguration of Shivajinagar-Swargate Metro) मेट्रोचे काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मान्यता मिळाली आहे. भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Pune Visit) यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन आहे. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Jitendra Awhad हिंदूविरोधी, नेटकऱ्यांनी काढली अक्कल)

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुण्याच्या २७ सप्टेंबरच्या दौऱ्याबाबत मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्यात दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी गुरुवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. दौरा अंतिम झाल्यानंतर आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.