दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

148
दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

कोकणातील परशुराम घाटात दरड कोसळल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. दरड कोसळल्यामुळे परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांची लांबच-लांब रांग लागली आहे. आता परशुराम घाटातील वाहतूक चिपळूण-लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गाने वळवण्यात आली आहे.

माहितीनुसार, सोमवारी रात्रीपासून शेकडो वाहने परशुराम घाट परिसरात खोळंबून होती. ही दरड कोसळल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत ही दरड हटवली जात नाही, तोपर्यंत परशुराम घाटातील वाहतूक पूर्ववत होणार नाही. त्यामुळे घाटातील वाहतूक इतर मार्गाने वळवली जात आहे.

(हेही वाचा – Muslim : ५० हून अधिक मुलींना फसवणारा सय्यद शाह खावर अलीला अटक)

गेल्या आठवड्यापासून परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे आठवडाभर हा घाट दिवसाचे पाच तास वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. पण अवकाळी पावसामुळे अर्धवट स्थितीत असलेले काम आणि कटाई केलेली डोंगराची माती घाटावरती आली आहे. यामुळे जी अवजड वाहने आहेत, ती फसली आहेत. जेसीपीच्या सहाय्याने घाटातील माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असून चिपळूण-लोटे-चिरणी-कळंबस्ते या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली गेली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.