Pune Accident: दिवे घाटात भीषण अपघात; दोघा जणांचा मृत्यू

193
Pune Accident: दिवे घाटात भीषण अपघात; दोघांचा जणांचा मृत्यू
Pune Accident: दिवे घाटात भीषण अपघात; दोघांचा जणांचा मृत्यू

पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाट येथे सोमवारी रात्री ८.३०च्या सुमारास एक टँकर दोन वाहनांना धडक देऊन सुमारे पन्नास फूट खाली दरीत कोसळला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांचे लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि पुणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, औद्योगिक दारू वाहतूक करणारा टँकर हडपसर येथील एका कंपनीकडे जात होता. पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय आहे. त्यामुळे टँकरने दोन दुचाकींना धडक देऊन टँकर दरीत घसरला आणि उलटला.

(हेही वाचा – दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद)

या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चालकासह दोघेजण टँकरच्या चालकाच्या केबिनमध्ये अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांची सुटका केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.