NIA Raids: टेरर फंडिंग विरोधात एनआयएची मोठी कारवाई; काश्मिर ते तामिळनाडूपर्यंत छापेमारी

118
NIA Raids: टेरर फंडिंग विरोधात एनआयएची मोठी कारवाई; काश्मिर ते तामिळनाडूपर्यंत छापेमारी
NIA Raids: टेरर फंडिंग विरोधात एनआयएची मोठी कारवाई; काश्मिर ते तामिळनाडूपर्यंत छापेमारी

टेरर फंडिंगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) मोठी कारवाई करत असल्याचे समोर आले आहे. जम्मू काश्मिरमध्ये एनआयए अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, शोपिया, राजौरी आणि पुंछ येथे एनआयएचे पथक छापेमारी करण्यासाठी पोहोचले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. तसेच दुसऱ्याबाजूला जम्मू काश्मिरप्रमाणे तामिळनाडूतही एनआयएची छापेमारी सुरू आहे.

तामिळनाडूत सुरू आहे सर्च ऑपरेशन

तामिळनाडूमध्ये एनआयएचे १०हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. माहितीनुसार, तपास यंत्रणेने पीएफआयसंबंधित लोकं आणि प्रमुख ठिकाणी छापा टाकत आहे. या प्रकरणी आधीच नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासादरम्यान हा छापा टाकण्यात आला आहे. याआधी केलेल्या कारवाईदरम्यान देशभरातून पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक करण्यात आली होती. तसेच २ मेला जम्मू काश्मिरमधील सहा जिल्ह्यातील १२ ठिकाणी, पीर पंजाल क्षेत्र, मध्य आणि दक्षिण काश्मिरच्या विविध ठिकाणी तपास केला होता.

(हेही वाचा – Pune Accident: दिवे घाटात भीषण अपघात; दोघांचा जणांचा मृत्यू)

पीएफआयवर गंभीर आरोप

पीएफआयबाबत अशी अनेक कागदपत्रे समोर येत आहेत, ज्यामध्ये पीएफआय दहशतवादी संघटना म्हणून काम करत असल्याचा आरोप आहे. याबाबत एनआयएची कारवाई सुरू आहे. २५ एप्रिल रोजी एनआयएने उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील १७ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. तसेच यापूर्वी, एनआयएने हिजबुल मुजाहिद्दीनचा नेता सय्यद सलाहुद्दीनच्या दोन मुलांचे जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात असलेले घर, दोन कालवे आणि जमीन जप्त केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.