State Level Trade Council : पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन; व्यापार क्षेत्रातील नवे बदल, मागण्यांवर चर्चा

54
State Level Trade Council : पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन; व्यापार क्षेत्रातील नवे बदल, मागण्यांवर चर्चा
State Level Trade Council : पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन; व्यापार क्षेत्रातील नवे बदल, मागण्यांवर चर्चा

व्यापार क्षेत्रातील नवे बदल, व्यापाऱ्यांचे विविध (State Level Trade Council)  प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे (State Level Traders Conference) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त व्यापारी परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे या परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. अन्यायकारक कायदे करणे, पारंपरिक व्यापार टिकवणे आणि वाढवणे, नव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे या विषयांवर या राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत चर्चा होणार आहे. (Discussion on new changes in trade sector, demands )

(हेही वाचा – Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले; तिघांचा मृत्यू)

ही परिषद दोन सत्रांमध्ये होणार आहे. या परिषदेत चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ-मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम-मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अँड ट्रेड (कॅमिट-मुंबई), द ग्रेन, राइस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन (ग्रोमा) (मुंबई) आणि दि पूना मर्चंटस चेंबरचे सहकार्य आहे. व्यापाऱ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई)चे अध्यक्ष जितेंद्र शहा, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र अँड ट्रेड (मुंबई)चे चेअरमन मोहन गुरनानी, अध्यक्ष दीपेन अग्रवाल, दे ग्रेन, राइस अँड ऑइल सीड्स मर्चंटस असोसिएशन (मुंबई)चे अध्यक्ष शरद मारू यांनी केले आहे.

या परिषदेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) , अजित पवार (Ajit Pawar) , पणनमंत्री अब्दुल सत्तार (Finance Minister Abdul Sattar) , केंद्रीय मंत्री भारती पवार (Union Minister Bharti Pawar), राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंघी (Sunil Singhi, Chairman, National Traders Welfare Board) उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.