Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले; तिघांचा मृत्यू

63
Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले; तिघांचा मृत्यू

एका भरधाव अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या ७ मजुरांना चिरडल्याची घटना बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील नांदुरा-मलगापूर मार्गावर घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सोमवारी २ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात एकूण ३ जण ठार, तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला.

यासंदर्भातील माहितीनुसार अमरावती जिल्ह्यामधील चिखलदरा तालुक्यातील मोरगाव येथील १० मजूर (Buldhana Accident) रोजगाराच्या शोधात नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर लागले होते. ते महामार्गालगतच्या वडनेर भोजली गावालगत एका झोपडीत झोपले होते. सोमवारी पहाटे साडे ५ च्या सुमारास एका भरधाव ट्रकने (पीबी ११ सीझेड ४०४७) या झोपडीला धडक दिली. त्यात ७ जण चिरडले गेले.

(हेही वाचा – Tembhu Yojana : उपोषण सुरू करण्याआधीच टेंभू योजनेला मान्यता…)

त्यापैकी प्रकाश बाबू जांभेकर (२६) व पंकज तुळशीराम जांभेकर (१८) हे दोघे जागीच ठार झाले. तर अभिषेक रमेश जांभेकर (१८) या तरुणाचा उपचारादरम्यान (Buldhana Accident) मृत्यू झाला. राजा जादू जांभेकर व दीपक खोजी बेलसरे हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मजूर गत आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.