Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कॉन्स्टेबल ला कारची धडक

१९ वर्षीय मुलाला सहार पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

61
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कॉन्स्टेबल ला कारची धडक
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कॉन्स्टेबल ला कारची धडक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai Airport) चेकपॉईंटवर एका BMW कारने CISF अधिकाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी ( १ ऑक्टोबर) रोजी घडली. ही कार त्या चालकाने धडक दिल्यानंतरही लगेच न थांबवता गाडी तशीच वेगात पुढे नेली आणि चालविणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाला सहार पोलीसानी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या राहुल शर्मा याला सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Airport)

पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. कॉन्स्टेबल राहूल शर्मा हे हायवेवरील सीआरपीएफ (CRPF) चेकपोस्ट क्रमांक १ येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर तैनात होते. एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने आली. कारने आधी प्लास्टिकच्या बॅरीकेडला धडक दिली आणि त्यानंतर ती तशीच पुढे आली व कॉन्स्टेबल राहूल शर्मा यांना उडवले. या धडकेमुळे शर्मा हे धाडकन जमीनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डोकं आणि तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. ही घटना रविवारी पहाटे चारच्या दरम्यान झाली. ही कार हृदय सज्जनराज कावर हा १९ वर्षाचा युवक चालवत होता. त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सहार पोलिसांनी मोटार वाहन कायदाचा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Airport)

(हेही वाचा : Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.