Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण

कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि ढोल ताशांच्या निनादात मुनगंटीवार लंडनकडे रवाना

136
Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे उद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काढले.

लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळ (Sudhir Mungantiwar) मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – GST Collection : सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात १० टक्क्यांची वाढ)

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी (Sudhir Mungantiwar) प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.