Open Book Exam : नववी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे पुस्तके उघडून परीक्षा देण्याची मुभा

इयत्ता ९ वी आणि १० वी साठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान आणि इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांना लक्ष्य करून निवडक शाळांमध्ये ओपन-बुक मूल्यांकनांची प्रायोगिक योजना सीबीएसई आखत आहे. या चाचण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती वेळ घेतला हे मोजणे आणि हितधारकांकडून अभिप्राय गोळा करणे हा यामागचा उद्देश आहे.

254
Open Book Exam : नववी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे पुस्तके उघडून परीक्षा देण्याची मुभा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्ड (CBSE Board) इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी (Open Book Exam) ओपन बुक एक्झामिनेशन (ओबीई) चा विचार करून आपल्या परीक्षा प्रणालीत लक्षणीय बदल करण्याचा विचार करीत आहे. हा विचार गेल्या वर्षी सादर केलेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या शिफारशींशी सुसंगत आहे.

(हेही वाचा – DELL : कहाणी जिद्दीची; कशी झाली कंप्युटर बनवणार्‍या ’डेल’ कंपनीची सुरुवात?)

याच पार्श्वभूमीवर सीबीएसईचे इयत्ता ९वी ते १२वीचे विद्यार्थी आता बाेर्डाच्या परीक्षा वगळता पुस्तके व नोट्स उघडून परीक्षा देऊ शकतील. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या (एनएफसी) शिफारशीअंतर्गत ही (Open Book Exam) ओपन बुक एक्झाम (ओबीई) पायलट प्रोजेक्ट म्हणून याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे. एनएफसीचे म्हणणे आहे की, यामुळे विद्यार्थ्यांत परीक्षेबद्दलचा अनावश्यक तणाव, चिंता कमी होईल. दिल्ली विद्यापीठाने २०२० मध्ये अशी परीक्षा घेतली होती. (Open Book Exam)

ओपन-बुक एक्झामिनेशन प्रयोगाची सुरुवात

इयत्ता ९ वी आणि १० वी साठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान आणि इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांना लक्ष्य करून निवडक शाळांमध्ये ओपन-बुक मूल्यांकनांची (Open Book Exam) प्रायोगिक योजना सीबीएसई आखत आहे. या चाचण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती वेळ घेतला हे मोजणे आणि हितधारकांकडून अभिप्राय गोळा करणे हा यामागचा उद्देश आहे.

(हेही वाचा – Organic India Green Tea : ऑरगॅनिक इंडिया ग्रीन टी प्या; स्वाद आणि आरोग्याचे वरदान!)

जूनपर्यंत ओपन-बुक एक्झामिनेशनच्या प्रायोगिक चाचणीची रचना

कोविड-19 महामारीच्या काळात खुल्या पुस्तकांच्या चाचण्यांमध्ये (Open Book Exam) अग्रेसर राहिलेल्या दिल्ली विद्यापीठाचे (डीयू) मार्गदर्शन घेऊन जूनपर्यंत ओबीई प्रायोगिक चाचणीची रचना आणि विकासाला अंतिम रूप देण्याची सीबीएसईची योजना आहे. या उपक्रमाला सुरुवातीच्या विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – Organic Farming Project : योग्य पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी ‘या’ गोष्टी फॉलो करा)

अनेक देशांमध्ये हा प्रयोग

यापूर्वी युरोप, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या अनेक देशांमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. (Open Book Exam)

सुरुवातीला काही शाळांतच

​​​​​​​सूत्रांनुसार, आपल्याकडे सुरुवातीला काही शाळांतच हा प्रयोग केला जाईल. नंतर तो देशभरात लागू केला जाईल.​​​​​​​ (Open Book Exam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.