IPL 2024 Rinku Singh : रिंकू सिंग जेव्हा अबराम खानचे चेंडू खेळताना अडखळतो…

IPL 2024 Rinku Singh : कोलकाता नाईट रायडर्सच्या सरावा दरम्यान लहानगा अबराम खान रिंकू सिंगला गोलंदाजी करताना दिसला. 

99
IPL 2024 Rinku Singh : रिंकू सिंग जेव्हा अबराम खानचे चेंडू खेळताना अडखळतो…
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL) थकवणाऱ्या वेळापत्रकात सरावा दरम्यान काही विरंगुळ्याचे प्रसंगही येतात. अशाच एका सरावा दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) संघाचा मालक शाहरुख खानचा मुलगा अबराम खानची गोलंदाजी खेळताना दिसतोय. विशेष म्हणजे लहानग्या अबरामने टाकलेल्या काही चेंडूंवर रिंकू अडखळलाही आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुख खानही या सरावावेळी उपस्थित होता आणि त्याचं मुलाच्या गोलंदाजीवर लक्षही होतं. (IPL 2024 Rinku Singh)

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील नातं या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर येत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी दिली आहे. (IPL 2024 Rinku Singh)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती)

रिंकू सिंगने ८ सामन्यांत केल्या इतक्या धावा

अबरामने फुल टॉस टाकलेला हा चेंडू रिंकू सिंग (Rinku Singh) खेळू शकला नाही, तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. अबराम आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता संघाच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावतो. आणि संघाबरोबरही वेळ घालवताना दिसतो. कोलकाता संघाने या हंगामात दणक्यात सुरुवात केली होती. पण, शेवटच्या ५ पैकी ३ सामने संघाने गमावले आहेत. रिंकू सिंगने ८ सामन्यांत ११२ धावा केल्या आहेत. (IPL 2024 Rinku Singh)

मधल्या फळीत धावांचा वेग वाढवण्यात माहीर असलेला रिंकू सिंग (Rinku Singh) अजून तरी या हंगामात लौकिकाला साजेशी फलंदाजी करू शकलेला नाही. पण, भारतीय संघातील त्याचं स्थान नक्की समजलं जातंय. (IPL 2024 Rinku Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.