Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती

110
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचं राजकारण जातींभोवती फिरतंय, लोकसभेच्या प्रचारातही नेत्यांकडून हीच रणनीती

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ५ टप्प्यात पार पडणार असून यातील दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र उर्वरीत तीन टप्प्यांसाठी आमदार, खासदार आणि नेते मंडळींनी सभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रीय मुद्दे, विकासाचे विषय, यासह नेतेमंडळी एकमेकांच्या वैयक्तित आयुष्यावरही भाष्य करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात जात-पोटजातीच्या जाणिवा भारी पडताना दिसत आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जातीसंदर्भात अनुभव ठळकपणे दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण जातींभोवती फिरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Loksabha Election 2024)

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये जातीपातींचे संदर्भ दिसून येत नाहीत. पण, मुंबई आणि ठाणे वगळता राज्याच्या इतर भागात यावेळी जातीय ध्रुवीकरण होताना दिसत आहे. याचे ठळक उदाहरण भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले, तर नांदेडमध्ये पोटजात आणि सोयरे या दोन घटकांभोवती निवडणूक पार पडली. वर्धा मतदारसंघातील तेली विरूद्ध कुणबी समाज अशी निवडणूक गेली काही वर्षे होत होती. मात्र यावेळी रामदास तडस विरूद्ध अमर काळे यांच्या लढतीच्या निमित्ताने बहुजन समाजातील दोन मोठ्या जाती पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार !)

चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने डीएमके फॅक्टर चालविला गेला. या तीन समाजांच्या एकगठ्ठा मतांमुळेच भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याची चर्चा आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकाच समाजाच्या दोन मुख्य उमेदवारांच्या पोटजातींकडे पाहून मतदान केले गेले. जळगाव आणि रावेरमध्ये दोन मोठ्या समाजांच्या मतदानाचे गणित मांडले गेले. तर दुसरीकडे ‘खान पाहिजे की बाण’ या फॉर्म्युल्यावर चालणाऱ्या परभणी मतदारसंघात यावेळी बाणच गायब झाल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यंदा मशालीवर, तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर शिट्टीवर निवडणूक लढले. त्यामुळे या ठिकाणी जातीचा थोडासा प्रभाव पडलाच असेल असे देखील सांगता येणार नाही. (Loksabha Election 2024)

महायुतीत भाजपाने ही निवडणूक जरी मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाविकास आघाडीने मात्र ही निवडणूक स्थानीय मुद्द्यांवर तसेच काही प्रमाणात जाती आणि पोट जातींवर घेऊन जात तशाच प्रकारचे उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक काही प्रमाणात जातीवरच जास्त गेल्याचे चित्र समोर आले आहे. (Loksabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.