Devendra Fadnavis: माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

89
Devendra Fadnavis: माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले, मात्र यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Devendra Fadnavis)

माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी, (३० एप्रिल) माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर येथून निवडणूक लढवत आहेत. यावेळी फडणवीस बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात माढ्यात उभ्या असणाऱ्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे. त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, कित्येक जणांवर हल्ले झाले, मात्र आता हे हल्ले सहन केले जाणार नाहीत. ही लोकशाही आहे. त्यामुळे इकडे ही ठोकशाही चालू देणार नाही’, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

(हेही वाचा – IPL 2024, KKR bt DC : वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्टच्या धडाक्याने कोलकाताचा दिल्लीवर दणक्यात विजय)

आम्ही २० वर्षांनी एकत्र आलो…
असे सांगून पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आम्ही २० वर्षांनी एकत्र आल्याचे सांगितले. आम्ही पुढच्या पिढीच्या भल्यासाठी एकत्र आलो, असे त्यांनी सांगितले, पण हे आपापल्या घरातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत. शरद पवार हे सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

फडणवीसांनी केली टीका
माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. ५० वर्षे ज्यांना नेतृत्व दिले, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं आणि घोषणा करत होते, अशी टीकाही अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.