IPL 2024, Chennai Super Kings : चेन्नईच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील ‘हा’ मोठा विक्रम

क्रिकेटच्या या सगळ्यात छोट्या प्रकारात चेन्नई सुपर किंग्जनी सगळ्यात जास्त वेळा दोनशे पेक्षा मोठी धावसंख्या नोंदवली आहे.

93
IPL 2024, Chennai Super Kings : चेन्नईच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील ‘हा’ मोठा विक्रम
IPL 2024, Chennai Super Kings : चेन्नईच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील ‘हा’ मोठा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्जचा संघ (Chennai Super Kings) आयपीएलमधील (IPL 2024) सगळ्यात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबईच्या बरोबरीने त्यांनी पाचवेळा ही लीग जिंकली आहे. आणि ही सातत्यपूर्ण कामगिरी करताना त्यांनी आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रविवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाने ३ बाद २१२ ही धावसंख्या उभारली. आणि डावात दोनशे पेक्षा जास्त धावा करण्याची संघाची ही ३५ वी खेप होती.

तुषार देशपांडेच्या ४ बळींच्या जोरावर चेन्नईने हा सामनाही मग ७८ धावांनी जिंकला. १८.५ षटकांत त्यांनी हैद्राबादचा डाव १३४ धावांतच गुंडाळला. पण, जगभरातील टी-२० सामन्यांतील आकडेवारी बघितली तर चेन्नईच्या या कामगिरीचं मोल लक्षात येईल.

(हेही वाचा – IPL 2024, KKR bt DC : वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्टच्या धडाक्याने कोलकाताचा दिल्लीवर दणक्यात विजय)

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा दोनशेच्या वर धावसंख्या करणारे संघ,
चेन्नई सुपरकिंग्ज – ३५
सॉमरसेट – ३४
भारतीय राष्ट्रीय संघ – ३२
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३१
यॉर्कशायर – २९
सरे – २८

(हेही वाचा – Nagpur airport : नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी, ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ)

सॉमरसेट हा संघ काऊंटी क्रिकेटमधील टी-२० प्रकारातील सर्वोत्तम संघ मानला जातो. धडाकेबाज फायर ब्रँड क्रिकेट खेळण्यासाठी सॉमरसेट काऊंटीचा संघ प्रसिद्ध आहे. आणि आतापर्यं त्यांनी सर्वाधिक ३४ वेळा दोनशे पेक्षा जास्त धावसंख्या रचली होती. पण, तो विक्रम सध्या तरी चेन्नई सुपर किंग्जनी (Chennai Super Kings) मोडीत काढला आहे.

त्यानंतर भारतीय राष्ट्रीय संघानेही ३२ वेळा दोनशे पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो तो ३१ वेळा ही कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा. पण, बंगळुरू संघाने एकदाही आयपीएल लीग जिंकलेली नाही. यॉर्कशायर आणि सरे या संघांचा त्यानंतर या यादीत क्रमांक लागतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.