Shiv Sena UBT चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व?

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमोर नतमस्तक व्हायला विसरले की, काँग्रेसच्या दबावाखाली दैवताशीही राजकीय शत्रुत्व पत्करलं, असा सवाल केला जात आहे.

198
Shiv Sena UBT चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी आपले दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमोर नतमस्तक व्हायला विसरले की काँग्रेसच्या दबावाखाली दैवताशीही राजकीय शत्रुत्व पत्करलं, असा सवाल केला जात आहे. (Shiv Sena UBT)

भाषणात सावरकर

वर्षभरापूर्वी म्हणजेच २६ मार्च २०२३ ला शिवसेना उबाठा पक्षातर्फे मालेगावात एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी जवळपास ३५ मिनिटाच्या भाषणात, साधारण ३.४० मिनिट (म्हणजेच भाषणाचा १० टक्के वेळ) ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सेल्युलर जेलमधील मरणयातनांचा ऊहापोह केला होता आणि सावरकर कसे महान क्रांतिकारक होते आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, यावरही भाष्य केले. (Shiv Sena UBT)

गांधींना इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान त्यांनी ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ असे वक्तव्य केले होते. यावरून खवळलेल्या उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे जाहीर सभेत नाव घेऊन त्यांना ठणकावले होते. “कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतोय, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहेत. लढायचं असेल तर दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही, अजिबात नाही.” अशी गर्जना त्यांनी केली होती. “या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, त्याला कुठे फाटे फुटू देऊ नका. मुद्दाम तुम्हाला डिवचलं जातंय. १४ वर्षे अंदमानच्या तुरुंगात मरणयातना सोसणे, हे येरागबाळ्याचे काम नाही,” याची आठवण करून देत, “लोकशाहीची लढाई लढायची असेल तर आमच्या दैवताचा अपमान सहन करणार नाही,” असा सज्जड दम ठाकरे यांनी गांधी यांना दिला होता. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतच १००हून अधिक जागा जिंकणार, अमित शहांचा दावा)

शिवसैनिकांनाही रुचणार नाही

अशा कट्टर सावरकरभक्त पक्षाचा उमेदवार अनिल देसाई छत्रपती शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतो आणि रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर स्मारकाकडे दुर्लक्ष करून निघून जातो, हे शिवसैनिकांनाही रुचणारे नाही. देसाई यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Shiv Sena UBT)

आमच्यासाठी सावरकर आजही दैवत

दुसरीकडे शिवसेना (शिंदे) पक्षाचे याच मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि उमेदवार राहुल शेवाळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले तसेच सावरकर स्मारकाला भेट देऊन नतमस्तक झाले. देसाई यांच्या कृतीबाबत शेवाळे म्हणाले, “शिवसेना आणि सावरकर हे वेगळे होऊच शकत नाहीत. ते आजही आमच्यासाठी दैवत आहेत, त्यामुळेच मी सावरकर यांच्या दर्शनासाठी गेलो. देसाई यांची शिवसेना पूर्वीची राहिली नाही. काँग्रेससोबत गेल्यामुळे उबाठासाठी आता सावरकर दैवत राहिले नाही. सावरकर स्मारकात गेल्याचे काँग्रेस नेत्यांना कळले तर त्यांचा रोष ओढवून घेतल्यासारखे होईल, त्यामुळे केवळ काँग्रेस दबावामुळे उबाठाने सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व घेतले,” असे मत शेवाळे यांनी व्यक्त केले. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.