‘त्या’ कथित व्हिडीओवर Amit Shah काय म्हणाले ? वाचा… 

‘त्या’ कथित व्हिडीओवर Amit Shah काय म्हणाले ? वाचा... 

131
‘त्या’ कथित व्हिडीओवर Amit Shah काय म्हणाले ? वाचा... 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा  (Central Minister Amit Shah) यांचा काही दिवसांपूर्वी फेक व्हिडीओ काँग्रेसतर्फे व्हायरल करण्यात आला होता. संबंधित फेक व्हिडीओ (Amit Shah Fake Video) शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल (Maharashtra Youth Congress Media Handle) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुहावटी येथे पत्रकार परिषद घेत अमित शाहा यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली.  (Amit Shah)

(हेही वाचा – Shiv Sena UBT चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व?)

या पत्रकार परिषदेमध्ये अमित शाहा (Amit Shah) म्हणाले की, काँग्रेसकडून माझ्या खोटा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला असून, भाजपाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.  

परिषदमध्ये अमित शाहा काय म्हणाले ?

आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत ४०० जागा मिळाल्यानंतर भाजपाकडून आरक्षण रद्द केले जाईल, असा खोटा प्रचार कॉंग्रेसकडून व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. काँग्रेसचा हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. भाजपाने कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विरोध केला नाही. भाजपाचा या आरक्षणाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली. (Amit Shah)

(हेही वाचा – Devendra Fadnavis: माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास )

अमित शाह (Amit Shah)  म्हणाले की, भाजपाला मिळालेले यश पाहून कॉंग्रेस निराश झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून असे खोटे व्हिडीओ (Fake Video) प्रसारित करून, खालच्या दर्जाचे राजकारण करण्यात येत आहे. असे फेक व्हिडीओ प्रसारित करून ते जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीकाही अमित शाह यांनी केली.       

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.