Ind vs Eng 4th Test : इंग्लिश संघात ऑली रॉबिनसन आणि शोएब बशीर

इंग्लिश संघाने नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी संघ जाहीर करण्याची प्रथा कायम ठेवली आहे. 

113
Ind vs Eng 4th Test : इंग्लिश संघात ऑली रॉबिनसन आणि शोएब बशीर
  • ऋजुता लुकतुके

रांची कसोटीत इंग्लंडने तेज गोलंदाज ऑली रॉबिनसन आणि फिरकीपटू शोएब बशीरला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षीय रॉबिनसन गेल्यावर्षी ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत खेळला होता. त्या कसोटीत त्याने ११ षटकं टाकली होती. पण, पाठदुखीमुळे पुढे तो गोलंदाजीला येऊ शकला नव्हता. त्यानंतर रांचीच्या संथ खेळपट्टीवर रॉबिनसन आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे. (Ind vs Eng 4th Test)

तर शोएब बशीर फारसा प्रभावी न ठरलेल्या रेहान अहमदची जागा घेणार आहे. रॉबिनसन मार्क वूड ऐवजी संघात आला आहे. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Open Book Exam : नववी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे पुस्तके उघडून परीक्षा देण्याची मुभा)

राजकोटची खेळपट्टी अगदी पहिल्या दिवसापासून संथ आणि त्यामुळे फिरकीला साथ देईल अशी चिन्हं आहेत. असं असताना इंग्लिश संघाने दोन तेज गोलंदाज खेळवले आहेत. तर बेन स्टोक्सनेही गोलंदाजी करण्याचं सुतोवाच केलं आहे. शोएब बशीर दुसऱ्या विशाखापट्टणम कसोटीत खेळला होता. त्यानंतर त्याला वगळण्यात आलं होतं. (Ind vs Eng 4th Test)

दुसरीकडे भारतीय संघात आकाशदीप सिंगने पदार्पण केलं आहे. खेळपट्टीचं स्वरुप पाहून संघात ४ फिरकीपटूंना खेळवण्याचा विचार सध्या संघाने मागे ठेवलाय. मोहम्मद सिराज हा एकमेव तेज गोलंदाज खेळवून कुलदीप, अक्षर, जडेजा आणि अश्विन अशी फिरकी चौकडी खेळवण्याचा भारताचा पूर्वी विचार आहे. (Ind vs Eng 4th Test)

रांची कसोटीसाठी इंग्लिश संघ,

बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जॉनी बेअरस्टॉ, जो रुट, बेन फोक्स, ऑली रॉबिनसन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर व टॉम हार्टली. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.