Manohar Joshi : राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला – नितीन गडकरी

डॉ. मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे.

112

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे २३ फेब्रुवारी २०१४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांनी पहाटे ३.०२ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे.

त्यांच्या (Manohar Joshi) निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(हेही वाचा – Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन)

राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला – नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लिहले की; “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या (Manohar Joshi) निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.”

(हेही वाचा – Manohar Joshi : महापालिकेतील लिपिक ते लोकसभा अध्यक्ष; असा होता डॉ. मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास)

सत्ता असो किंवा नसो मनोहर जोशी नेहमी हसत खेळत राहिले – सुशील कुमार शिंदे

अतिशय दुःखद आणि वाईट बातमी आहे. मनोहर जोशी (Manohar Joshi) हे अतिशय सामान्य घरातून शिक्षण घेऊन उत्तम शिक्षण बनले. प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी ही जोडी असायची. जोशी सर अतिशय शांत पद्धतीने विचार करून बोलायचे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात सरांनी धडाडीने काम केले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उत्तम काम केलं. असा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. सत्ता असो किंवा नसो मनोहर जोशी हे नेहमी हसत खेळत राहिले. लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तम सांभाळली.

(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार गटाला मिळाले तुतारी निवडणूक चिन्ह)

सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेणारे मनोहर जोशी – शरद पवार

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो.

भावपूर्ण श्रद्धांजली…!

अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले – संजय राऊत

शून्यातून विश्व निर्माण करणारे..कडवट महाराष्ट्र अभिमानी.. अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना विनम्र अभिवादन!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.