बेस्टच्या ‘या’ कार्डवर आता शॉपिंगही करता येणार

89

प्रवाशांना कायमच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमांतर्गत अनेक प्रयत्न करण्यात येतात. बेस्ट बसचे तिकीट किंवा पास काढताना प्रवाशांना येणारी रोख रक्कमेची अडचण लक्षात घेऊन, बेस्ट उपक्रमाकडून आता एक सामायिक कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या कार्डचा वापर करुन प्रवाशांना शॉपिंगही करता येणार आहे.

कार्ड एक, फायदे अनेक

प्रवाशांसाठी एकच सामायिक कार्ड अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड(NCMC)ची सेवा बेस्टकडून सुरू करण्यात आली आहे. हे कार्ड प्रवाशांना सर्व आगारांत उपलब्ध होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेमधूनही प्रवास करणे शक्य होणार आहे. इतकंच नाही तर या कार्डचा वापर करुन दुकाने, उपहारगृहे तसेच ऑनलाईन वस्तू देखील खरेदी करता येणार आहेत. येस बँक आणि नॅशनल पेमेंट ऑफ इंडियाची मालकी असलेल्या रुपे सोबत भागीदारी करत हे कार्ड जारी करण्यात आले आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)

कसे मिळणार कार्ड?

देशभरातील 20 लाखांपेक्षा अधिक रुपे टर्मिनसच्या ठिकाणी या कार्डचा वापर करता येणार असून, याद्वारे ऑनलाईन देयकेही देता येणार आहेत. सुरुवातीला केवळ 100 रुपयांमध्ये हे कार्ड मुंबईतील सर्व बेस्ट आगारांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केल्यानंतर हे कार्ड प्रवाशांना देण्यात येईल. तसेच बेस्ट वाहकांकडून हे कार्ड त्वरित रिचार्ज करण्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.