‘या’ ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

94

पश्चिम द्रुतगती मार्गाने जाणा-या मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गोरेगाव हब माॅलजवळील फ्लायओव्हरवर मोठा अपघात झाला आहे. एक अवजड ट्रक पुलाच्या सुरुवातीलाच डिव्हायडरवर जाऊन आदळल्याने अपघात झाला. सध्या घटनास्थळी 15 अग्निशमन दल दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी ट्रक काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्राफिक जाम झाले आहे. त्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मालाड पूर्वेपासून अंधेरी पूर्वेपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याचे सांगितले जात आहे. जवळपास 40 मिनीटे ट्रॅफिक जाममध्ये फसल्याचे एका नेटक-याने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.