North Madhya Lok Sabha Constituency : पूनम महाजन यांच्या जागी माजी मंत्र्यांचे नाव चर्चेत

मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून पुनम महाजन सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला आहे. मात्र, सन २०१४च्या निवडणुकीत एकूण मतांच्या तुलनेत ५६.६१टक्के मते घेणाऱ्या महाजन यांच्या मतांचा टक्का ३ टक्क्यांनी कमी झाला होता.

263
Lok Sabha Election 2024 : उत्तर मुंबईसह उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसला उमेदवार सापडेना, काँग्रेसमध्ये वाढतेय उबाठा शिवसेनेविरोधात खदखद

मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील (North Madhya Lok Sabha Constituency) भाजपाचे खासदार पुनम महाजन यांच्या जागी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु आहे. या मतदार संघातून आधी माधुरी दिक्षित आणि त्यानंतर ऍड. आशिष शेलार यांचे नाव चर्चेत असतानाच आता महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. हे माजी मंत्री आता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आहे. ते याच मतदार संघातील मतदार असून त्यांचे नाव आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे नेते या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार होतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे. (North Madhya Lok Sabha Constituency)

मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून (North Madhya Lok Sabha Constituency) पुनम महाजन सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला आहे. मात्र, सन २०१४च्या निवडणुकीत एकूण मतांच्या तुलनेत ५६.६१टक्के मते घेणाऱ्या महाजन यांच्या मतांचा टक्का ३ टक्क्यांनी कमी झाला होता. सन २०१९च्या निवडणुकीत महाजन यांना ५३.९७ टक्के मते प्राप्त झाली होती. तर प्रिया दत्त यांना सन २०१४मध्ये ३४.५२ टक्के मते मिळाली होती, तर सन २०१९मध्ये प्रिया दत्त यांना ३९.५५ टक्के मते मिळाली होती. म्हणजे प्रिया दत्त यांच्या मतांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, पुनम महाजन यांच्यात संघटनेतील संपर्क कमी असल्याने मागील काही महिन्यांपासून संघटनांमध्ये पदाधिकाऱ्यांसोबतच जुळत नाही. त्यामुळे पक्षातच त्यांना आता विरोध होत आहे. त्यामुळे महाजन यांच्या ऐवजी पक्ष संघटनाला महत्व देणाऱ्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. (North Madhya Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय)

विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

त्यामुळे मागील काही दिवसांपासून या मतदार संघातून महाजन यांच्या ऐवजी माधुरी दिक्षित यांना उमेदवारी देण्याची चर्चा जोरात सुरु असल्याचे ऐकायला मिळत होते. माधुरी दिक्षितचे बॅनर प्रदर्शित झाले होते, त्यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. परंतु माधुरी दिक्षित यांनी आपण याचा विचार केला नसल्याचे सांगत या चर्चेलाच पुर्णविराम दिल्याचे पहायला मिळाले होते. परंतु या मतदार संघातील मतदारांमधील चर्चेनुसार या मतदार संघात भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या नावाला पसंती असल्याचे ऐकायला मिळत आहे. शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. आणि या मतदार संघात शेलार यांच्यासह विलेपार्ले विधानसभा भाजपाकडे असून चांदीवली आणि कुर्ला या मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे झिशान सिध्दीकी आणि कलिना मतदार संघातून शिवसेना उबाठाचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघातील चार मतदार संघ हे युतीला पुरक आहेत. (North Madhya Lok Sabha Constituency)

शेलार यांचे या सर्व विधानसभांमध्ये चांगलीच तोंड ओळख असल्याने ते काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर देऊ शकतात, असे बोलले जाते. शेलार हे भारतीय क्रिकेट असोशिएशनचे खजिनदार असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे शेलार यांना दिल्लीत पाठवण्याचा पक्षाचा विचार असून त्यांच्या नावाची चर्चा विभागात सुरु असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात आनंद दिसून येत आहे. परंतु शेलार हे या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक नसून त्यांनी यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सचिन तेंडुलकर यांनी याला स्पष्ट नकार दिल्याने या जागेसाठी माजी मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. (North Madhya Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Neelam Gorhe : राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप; अमित शाहांच्या भेटीविषयी नीलम गोऱ्हे काय म्हणतात ?)

बाबा सिध्दीकी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक

विनोद तावडे यांचे निवासस्थान विलेपार्ले येथून असून ते उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मतदार आहेत. सन २००८ ते २०१४ या कालावधीत तावडे हे विधान परिषदेचे सदस्य होते, तर सन २०१४मध्ये बोरीवली विधानसभा मतदार संघातून विजयी झाले होते. परंतु २०१९च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाची जबाबदारी सोपवून त्यांची नियुक्ती पक्षाचे केंद्रीय सरचिटणीसपदी केली होती. त्यामुळे विनोद तावडे हे या मतदार संघातून उभे राहिल्यास शेलार यांचे दिल्लीत जाण्याचा मार्ग बंद होणार आहे. शेलार यांना दिल्लीत जायचे नसल्याने त्यांच्याकडून या मतदार संघासाठी अनेकांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यातूनच विनोद तावडे यांचे नाव पुढे आल्याचे बोलले जात आहे. (North Madhya Lok Sabha Constituency)

या लोकसभा मतदार संघातून सलग दोन वेळा पराभूत झालेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांची आता निवडणूक लढवण्याची इच्छा दिसत नसून त्यांच्या ऐवजी माजी आमदार बाबा सिध्दीकी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर दुसरीकडे नसीम खानही इच्छुक आहेत. त्यामुळे बाबा सिध्दीकी आणि शेलार यांना उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणुकीतील कट्टर प्रतिस्पर्धी आता लोकसभेतही पहायला मिळतील अशी शक्यता आहे. (North Madhya Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Mumbai-Pune Express वर अपघातांची संख्या घटली)

सन २०१९ची लोकभा निवडणूक

भाजपा, पुनम महाजन, एकूण मते : ४,८६,६७२

काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते : ३, ५६,६६७

सन २०१४ची लोकभा निवडणूक

भाजपा, पुनम महाजन, एकूण मते : ४,७८,५३५

काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते : २,९१,७६४

सन २००९ची लोकभा निवडणूक

काँग्रेस, प्रिया दत्त, एकूण मते : ३,१९,३५२

भाजपा, महेश जेठमलानी, एकूण मते : १,४४, ७९७

मनसे, शिल्पा सरपोतदार, एकूण : १, ३२, ५४६

लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्र आणि निवडून आलेले आमदार

विलेपार्ले : भाजपा, पराग अळवणी

चांदीवली : शिवसेना, दिलीप लांडे

कुर्ला : शिवसेना, मंगेश कुडाळकर

कलिना : शिवसेना उबाठा, संजय पोतनीस

वांद्रे पूर्व : काँग्रेस, झिशान सिध्दीकी

वांद्रे पश्चिम : भाजपा, ऍड. आशिष शेलार (North Madhya Lok Sabha Constituency)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.