Mumbai-Pune Express वर अपघातांची संख्या घटली

परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाय-योजनांमुळे एक्सप्रेस वे वरील अपघात आणि मृत्यू घटले आहेत.

639
विविध सुरक्षा उपायांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Express) वरील अपघात कमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात १७.६२ तर मृत्युमध्ये ३२.२५ टक्यांनी घट झाली आहे. मुंबई आणि पुणे शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान होण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची (Mumbai-Pune Express) निर्मिती करण्यात आली. एक्सप्रेस वे मुळे दोन शहरांमध्ये प्रवास सुसाट झाला. परंतु वाढलेल्या वेगासोबत अपघातांची संख्यादेखील वाढू लागली. एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात आणि मृत्युची गंभीर दखल घत परिवहन विभागाने सुरक्षा मोहिम राबविली. वाहनांच्या सुसाट वेगावर मर्यादा आणली.

परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाय-योजनांमुळे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Express) वरील अपघात आणि मृत्यू घटले आहेत. एक्सप्रेस वे वर वर्ष २०२२ मध्ये एकूण १९८ अपघात घडले होते. त्यात प्राणांतिक अपघातांची संख्या ७३ होती. तर ९२ जणांनी अपघातात जीव गमवला होता. त्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये अपघात आणि मुत्युमध्ये घट झाली आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Express) वरील प्रवास सुरक्षित होत आहे.

वर्षे           मृत्यू       एकूण अपघात
२०१९        ९२          ३५३
२०२०        ६६         १६१
२०२१        ८८                     २००
२०२२        ९२                     १९८
२०२३        ६३                     १५३

राज्यातील एकूण अपघातांची संख्या

वर्ष             मृत्यू          अपघात
२०१९         १२,७८८      ३२,९२५
२०२०         ११,५६९      २४,९७१
२०२१         १३,५२८      २९,४७१
२०२२         १५,२२४      ३३,८३३
२०२३         १५,००९       ३४,११४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.