Mumbai C.C Road : रस्त्यांची अर्धवट कामे ३१ मे पर्यंत बंद करा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्‍ते कामांचा आढावा घेत यासंदर्भात आवश्‍यक ती कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्‍याच्‍या सूचना यंत्रणांना दिल्‍या आहेत.

792
Mumbai C.C Road : रस्त्यांची अर्धवट कामे ३१ मे पर्यंत बंद करा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रगतिपथावर असून या सर्व रस्‍त्‍यांची कामे पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्‍हणजेच दिनांक ३१ मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावीत, हे कॉंक्रिट रस्‍ते वाहतूक योग्य स्थितीत ठेवावेत तसेच इतर रस्‍त्‍यांवर आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. तसेच पावसाळ्यात सुरु राहतील, अशा प्रकारची रस्‍ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, जेणेकरुन नागरिकांना, वाहतुकीला त्रास होऊ नये, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. (Mumbai C.C Road)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्‍ते कामांचा आढावा घेत यासंदर्भात आवश्‍यक ती कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्‍याच्‍या सूचना यंत्रणांना दिल्‍या आहेत. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने ३९८ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यापैकी, पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. (Mumbai C.C Road)

(हेही वाचा – भारतीय शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून शिक्षण घेतलेले Pandit Vasantrao Deshpande)

सिमेंट काँक्रिट रस्‍ते बनविण्‍यासाठी रस्‍ता खणण्‍यापासून ते काम पूर्ण होऊन रस्‍ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. जर प्राधान्‍याने रस्‍ते पूर्ण करण्‍याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्‍यान काँक्रिट रस्त्यांची कामे अपूर्णावस्‍थेत आढळतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर कोणत्‍याही परिस्थितीत सध्‍या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरण रस्‍ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, अन्‍यथा कंत्राटदार व अभियंत्‍यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) दिले आहेत. तसेच, ३१ मे २०२४ नंतर सुरु राहतील, अशा प्रकारची रस्‍ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, जेणेकरुन पावसाळ्यात अडचण होवू नये, अशा सूचनादेखील देण्‍यात आल्‍या आहेत. (Mumbai C.C Road)

पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची डागडुजी…

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आवश्यक तेथे डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरूस्‍ती करण्यासाठी देखील महानगरपालिका प्रशासनाकडे (Municipal Administration) सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने लवकरच सेवा रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या सातही परिमंडळांतील विविध रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. एकूणच, पावसाळ्यात मुंबईतील सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍यांसह सर्वच रस्त्यांची चांगली स्थिती राखली जाईल, यासाठी महानगरपालिकेने नियोजनपूर्वक कामांना वेग दिला आहे. (Mumbai C.C Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.