सावधान: Netflix चा पासवर्ड शेअर करताय? होऊ शकते जेल

115

Netflix Password Sharing आात महागात पडणार आहे. अनेकजण Netflix चा पासवर्ड मित्रांना देतात आणि प्लॅनचे पैसेदेखील स्प्लिट करुन भरतात. परंतु, लवकरच Netflix चे अकाऊंट शेयर करणे महागात पडणार आहे. कंपनी यासाठी पैसे आकारण्याची योजना बनवत आहे. तसेच, 2023 मध्ये Netflix चा पासवर्ड दुस-याला शेअर करणे हे बेकायदेशीर मानले जाणार आहे. हा एक क्रिमिनल फ्राॅड म्हणूनही गणला जाण्याची शक्यता आहे. तसेच, संबंधित व्यक्तीला जेलची हवादेखील खावी लागू शकते. याबाबत लवकरच नियम आखले जाणार आहेत.

लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफाॅर्म नेटफ्लिक्स अशा लोकांकडून नेटफ्लिक्सचा वापर सुरु ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क मागू शकते. कंपनीचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेईंग लाॅन्ग यांनी एका ब्लाॅग पोस्टमधून म्हटले आहे की, पासवर्ड घराच्या बाहेर शेअर केल्यामुळे आमची चांगल्या कन्टेन्टमध्ये गुतंवणूक करण्याची क्षमता कमी होते. चेईंग लाॅन्ग म्हणाले की, सर्वप्रथम चिल्ली, कोस्ट रिका आणि पेरुमध्ये Add an Extra member फीचरची टेस्टिंग केली जाईल. अतिरिक्त मेंबरला वेगळे लाॅग इन आणि पासवर्ड मिळेल. तसेच, त्या मेंबरला जवळपास 2 ते 3 डाॅलर्स दरमहिना अतिरिक्त द्यावे लागतील, अशी माहिती लाॅन्ग यांनी ब्लाॅग पोस्टमध्ये दिली आहे.

( हेही वाचा: Fact Check: आधार कार्ड धारकांना मिळणार 80 हजार रुपये? )

टेस्टिंगनंतर हे फिचर होणार लाॅंन्च

यूजर्स आपले प्रोफाईल नवीन अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करु शकतील. जास्तीत जास्त दोन सब अकाऊंट जोडता येतील. येत्या काही आठवड्यांत हे फिचर रोल आउट करण्यात येईल. टेस्टिंग केल्यानंतर हे फिचर इतर देशांमध्ये सादर करायचे की नाही हे ठरवण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.