नववर्षात गृहिणींना मिळणार दिलासा! घरगुती सिलिंडरच्या किंमती कमी होणार?

113

गेल्या काही दिवसांपासून महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. डिसेंबर महिना संपायला आता काही दिवस बाकी राहिले आहेत. नव्या वर्षात सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या किमती कमी करू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने गॅसच्या किमती कमी केल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( हेही वाचा : IPL २०२३ मधील सर्वात महागडा खेळाडू! १८.५० कोटींची सर्वाधिक बोली…)

सिलिंडरच्या किमती कमी होणार? 

सरकारी तेल कंपन्या LPG गॅस सिलिंडरच्या किमती नववर्षात कमी करून ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. सध्या दिल्लीमध्ये सिलिंडरसाठी १ हजार ५३ रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामध्ये एलपीजी गॅसच्या किमती १ हजार ७९ रुपये, मुंबईत १ हजार ५२ रुपये आणि चेन्नईमध्ये गॅसच्या किमती या १ हजार ६८ रुपये आहेत. जुलै २०२२ पासून LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या दरात कपात करणार असल्याते बोलले जात आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८५ डॉलरच्या जवळपास होती तेव्हा घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ८९९ रुपये होती. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८३ डॉलर तर भारतीय बॅरेलची किंमत प्रति बॅरल ७७ डॉलरच्या आसपास आहे म्हणूनच सिलिंडरच्या किमती कमी होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.