Malaria प्रसार साखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज – डॉ. श्रीनिवास

मुंबईला हिवताप मुक्त करण्यासाठी विविध यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांसह नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे.

101
Malaria प्रसार साखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज - डॉ. श्रीनिवास

हिवताप (Malaria) प्रसार साखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. तसेच हिवताप नियंत्रणाकरिता उपचार कालावधी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर संशोधन होत आहे. त्यामुळे उपचार कालावधी कमी करण्यासाठी भारतातही त्याच उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच वैद्यकीय चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च बेंगळुरूचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास बी.एम. यांनी मांडले. (Malaria)

मुंबईला हिवताप मुक्त करण्यासाठी विविध यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांसह नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. याचाच भाग म्हणून हिवताप नियंत्रणासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जागतिक हिवताप दिनाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, उपचार, मार्गदर्शन तसेच मलेरिया निर्मूलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन २४ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले होते. (Malaria)

(हेही वाचा – Traffic Police : मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका; ५२ हजार रिक्षाचालकांवर कारवाई)

हिवताप मुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरु 

मुंबईत हिवताप मुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठीची नियोजनबद्ध कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मुंबईला हिवताप मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आणि जनजागृती करण्याच्याही सूचनाही गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. हिवताप नियंत्रण करण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थाने प्रतिबंध करणे, तसेच सर्व महानगरपालिकेचे दवाखाने, रुग्णालये येथे तापाच्या रुग्णाकरिता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (Malaria)

नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे पार पडलेल्या परिसंवादासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये तथा अधिष्ठाता (नायर दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अन्द्राडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जयंती शास्त्री, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास बी. एम., सेठ गोकुलदास शामल वैद्यकीय रूग्णालय आणि राजे एडवर्ड स्मारक रूग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. कविता जोशी, मुंबई महानगरपालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी चेतन चौबळ, मुंबई शहर (इंडियन मेडिकल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. लाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. (Malaria)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उबाठाच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घटकासाठी कोणती आहेत आश्वासने?)

यावर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचे ‘हे’ आहे घोषवाक्य 

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी डॉक्टर्स, फॅमिली फिजिशियन, मुंबई (इंडियन मेडिकल असोसिएशन) पदाधिकारी व सदस्य तसेच महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर्स इत्यादींकरिता नायर दंतविद्यालय येथील सभागृहात २४ एप्रिल २०२४ रोजी एक दिवशीय परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हिवतापाविरुद्धच्या लढ्यात हिवताप रूग्ण उपचार व मार्गदर्शन, प्रयोगशाळा निदानाचे महत्त्व, मूलगामी उपचारांची गरज, समुदाय जागरूकता आणि मुंबईतील डासांच्या उत्पत्ती नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. (Malaria)

यावर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य “हिवताप निर्मूलन: हिवतापाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा हिवतापाला हरविण्यासाठी’ वर्ष २०२४ साठीचे घोषवाक्य” असे आहे. त्यामुळे मुंबईला हिवताप मुक्त करण्याच्या वचनबद्धतेबद्दल समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये तथा अधिष्ठाता (नायर दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अन्द्राडे यांनी मांडले. (Malaria)

(हेही वाचा – Sharad Pawar Group Manifesto : स्वयंपाक गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणणार; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आश्वासन)

मूलगामी उपचारांची गरज आणि प्रयोगशाळेतील निदान बळकट करण्याच्या महत्त्वावर भर

यावेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, हिवतापाच्या रुग्णांनी वेळीच उपचार तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. खासगी डॉक्टरांनी हिवतापाचा रुग्ण आढळल्यास संबंधित विभागीय आरोग्य अधिकारी यांना संपूर्ण माहितीसह त्वरित कळविणे गरजेचे आहे. हिवताप (मलेरिया) तपासणीस (इन्वेस्टीगेटर) व आरोग्य कर्मचारी यांनी वस्तीपातळीवर सातत्याने गृहभेटी देऊन सर्वेक्षण करावे. तसेच रुणांनी हिवतापाचे उपचार अर्धवट सोडू नये, संपूर्ण उपचार घ्यावे, घरात व घराच्या आसपास पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहन डॉ. शहा यांनी केले. हिवतापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित उपचार व वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही शहा म्हणाल्या. (Malaria)

प्राध्यापिका डॉ. कविता जोशी यांनी हिवतापाच्या निमित्ताने वैद्यकीय पैलू, अभ्यास प्रकरपण (केस स्टडी) आणि शासकीय/राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांसह विविध उपचारांवर चर्चा केली तसेच मूलगामी उपचारांची गरज आणि प्रयोगशाळेतील निदान बळकट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी मुंबईतील डासांच्या उत्पत्ती नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी आणि समुदाय जागरूकता यावर लक्ष केंद्रित केले. पाणी साचण्यापासून रोखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि हिवतापाचा सामना करण्यासाठी समुदायाला एकत्र काम करण्याचे आवाहन चौबळ यांनी केले आहे. (Malaria)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.