Sharad Pawar Group Manifesto : स्वयंपाक गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणणार; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आश्वासन

जीएसटीच्या माध्यमातून देशातल्या लोकांना लुबाडण्याचे काम सुरु असून त्याला मानवी चेहरा देणे आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

97
Sharad Pawar Group Manifesto : स्वयंपाक गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणणार; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आश्वासन

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी (२५ एप्रिल) आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देतानाच सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेण्यासाठी धोरण अवलंबवले जाईल, असे आश्वासन दिले आहे. याशिवाय महिला वर्गाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्वयंपाक गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीने दिले आहे. (Sharad Pawar Group Manifesto)

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून गुरुवारी पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने शपथपत्र या नावाने हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. (Sharad Pawar Group Manifesto)

आम्ही शपथपत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील. गत्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करताना पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचे काम केले जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. (Sharad Pawar Group Manifesto)

(हेही वाचा – America : मणिपूरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; अमेरिकेतील अहवालानंतर भारताने सुनावले)

देशभरात ३० लाखाच्या आसपास सरकारी जागा रिक्त आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचे शासकीय नोकरीतील आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटीच्या माध्यमातून देशातल्या लोकांना लुबाडण्याचे काम सुरु असून त्याला मानवी चेहरा देणे आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar Group Manifesto)

अॅप्रेंटिससंदर्भात मुलगा पदवी पास झाल्यानंतर त्याला एक वर्षासाठी साडेआठ हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असून आमचे सरकार आल्यानंतर ते शुल्क माफ केले जाईल. शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळात तातडीने आरक्षण देण्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली. (Sharad Pawar Group Manifesto)

राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यातील आश्वासने

  • अग्निवीर योजना रद्द करणार.
  • शेती वस्तूंवरील जीएसटी शून्य करणार.
  • शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती.
  • शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांच्या भरतीला पायबंद घालणार.
  • खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद करू.
  • अल्पसंख्याक समाजासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करणार. (Sharad Pawar Group Manifesto)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.