NCERT Decision : इंडिया नाही आता भारतच! शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार

'भारत' शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे

79
NCERT Decision : इंडिया नाही आता भारतच! शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार
NCERT Decision : इंडिया नाही आता भारतच! शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार

एनसीईआरटीने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. यापुढे NCERT च्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाहीये या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. ‘भारत’ शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे. (NCERT Decision)

NCERT नं पुस्तक निर्मितीसाठी १९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. त्यासोबतच प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता NCERT च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पहावं लागेल.

(हेही वाचा : Scientific Honor : भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार !)

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पॅनेलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी भारत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पॅनलच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. हा बदल एनसीईआरटी पुस्तकांच्या पुढील संचामध्ये दिसून येईल. सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण आता त्याला औपचारिक पाठिंबा मिळाला आहे.
देशातील विरोधी आघाडीने त्यांचे नाव बदलून I.N.D.I.A.ठेवल्यानंतर यावरुन जोरदार चर्चा होत होती. आता अशातच एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये INDIA या शब्दाऐवजी भारत हा शब्द सर्वत्र वापरला जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या पॅनेलसमोर मांडण्यात आला, जो एकमताने स्वीकारण्यात आला आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.