Navaratri 2023 : नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी पर्यंत बेस्ट च्या २६ जादा बसेस

या जादा बस गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

34
Navaratri 2023 : नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी पर्यंत बेस्ट च्या २६ जादा बसेस
Navaratri 2023 : नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी पर्यंत बेस्ट च्या २६ जादा बसेस

गणपती नवरात्रौत्सवासाठी भाविक मोठ्याप्रमाणावर मुंबईत गर्दी करता यासाठी मध्य रेल्वे तसेच मुंबई बेस्ट यावेळी विशेष जादा फेऱ्या वाढवतात. सध्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने २६ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते २३ ऑक्टोबर या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी ते महालक्ष्मी मंदिर, सीपी टँक ते महालक्ष्मी मंदिर दरम्यान दोन नव्या मार्गांवर बसेस चालवण्यात येणार आहेत.त्यामुळे इतर सणांप्रमाणे नवरात्रौत्सवातही बेस्ट भाविकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. बेस्ट प्रशासनाने यासाठी अतिरिक्त बसेस सोडल्या असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर या जादा बस गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे. (Navaratri 2023 )

(हेही वाचा : Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या आरोपावर अजित पवारांचा खुलासा, नेमकं काय झालं ? वाचा)

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवातही बेस्ट भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता उपनगरातून येणारे बस मार्ग ३७ कुर्ला स्थानक पश्चिम ते जे मेहता मार्ग, बस मार्ग ५७ प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी ते वाळकेश्र्वर, बस मार्ग १५१ वडाळा आगार ते जे मेहता मार्ग, बस मार्ग ए ६३ भायखळा स्थानक पश्चिम ते जे मेहता मार्ग, बस मार्ग ए ७७ भायखळा स्थानक पश्चिम ते ब्रीच कॅन्डी रुग्णालय, बस मार्ग ए ७७ जादा संत गाडगे महाराज चौक सात रस्ता ते ब्रीच कॅण्डी रुग्णालय, बस मार्ग ८३ सांताक्रुझ आगार ते कुलाबा बस स्थानक व बस मार्ग ए ३५७ शिवाजीनगर आगार ते मुंबई सेंट्रल आगार या बस मार्गांवर २६ जादा बसेस चालवण्यात येणार आहेत.तसेच नवीन बस मार्ग प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी ते लालबाग चिंचपोकळी मार्गे महालक्ष्मी मंदिर असा सुरू करण्यात येणार असून दुसरा नवीन बस मार्ग कस्तुरबा गांधी चौक, सी पी टॅंक ते महालक्ष्मी मंदिर मार्गे प्रार्थना समाज व ताडदेव दरम्यान भाविकांच्या सेवेत धावत आहेत.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.