Narendra Modi : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली, ट्विटरद्वारे व्यक्त केले विचार

154

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे योगदान अतुलनीय आहे. जगभरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज डॉ. कलामांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन (World Students Day) म्हणून साजरा केला जातो. आज त्यांची ९२वी जयंती आहे.

भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे ११ वे राष्ट्रपती, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षक आणि लेखक होते. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे, मानवी मूल्ये रुजवणे, तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याची क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगाला सामोरे जाण्यासाठी तयार करायला हवे, असे त्यांचे म्हणणे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विटरद्वारे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे त्यांच्या नम्र वागणुकीमुळे आणि विशेष वैज्ञानिक प्रतिभेमुळे जनमानसात लोकप्रिय होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. राष्ट्र उभारणीत त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान सदैव स्मरणात राहिल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.