Ind vs Pak : … आणि क्रिकेटच्या देवाने पाकिस्तानी गोलंदाजाची बोलती बंद केली

38
Ind vs Pak : ... आणि क्रिकेटच्या देवाने पाकिस्तानी गोलंदाजाची बोलती बंद केली

काल म्हणजेच शनिवार १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अतिशय रोमांचक असा (Ind vs Pak) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करण्यात भारतीय संघ सलग आठव्यांदा यशस्वी झाला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप २०२३ मध्ये झालेल्या लढतीत (Ind vs Pak) पाकिस्तानवर ७ विकेटनी विजय मिळवला. या वर्ल्ड कपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. गोलंदाजांनी केलेली शानदार कामगिरी आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८६ धावा हे भारताच्या विजयाची मुख्य वैशिष्टे ठरली. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने १९२ धावांचे आव्हान केवळ ३०.३ षटकात सहज पार केले.

या सामन्यापूर्वी (Ind vs Pak) सोशल मीडियावरून अनेक चर्चा, वाद – विवाद सुरु होता. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक ट्विट करून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या त्या ट्विटवर चक्क क्रिकेटच्या देवाने म्हणजेच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने चोख उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली आहे.

(हेही वाचा – ED Raid : राज्यभरात ईडीची धडक कारवाई; बापरे! ‘इतक्या’ कोटींच्या मालमत्ता जप्त)

नेमका प्रकार काय?

शोएब अख्तरने १३ ऑक्टोबर रोजी ट्वीटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला बाद करतानाचा जुना फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, उद्या तुम्हाला असे काही करायचे असेल तर शांत राहा. आता त्याच पोस्टला मास्टर ब्लास्टरने उत्तर दिले आहे. त्याने दिलेल्या रिप्लायचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Ind vs Pak)

सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘माझ्या मित्रा तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.’ (Ind vs Pak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.