ED Raid : राज्यभरात ईडीची धडक कारवाई; बापरे! ‘इतक्या’ कोटींच्या मालमत्ता जप्त

27
ED Raid : राज्यभरात ईडीची धडक कारवाई; बापरे! 'इतक्या' कोटींच्या मालमत्ता जप्त

ईडीकडून (ED Raid) पुन्हा एकदा राज्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ईडीने ७० ठिकाणी छापे टाकून तब्बल ३१५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथून ही मालमत्ता जप्त केली आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए २००२ अंतर्गत १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ही कारवाई (ED Raid) करण्यात आली आहे.

(हेही वाचा – IND vs PAK World Cup : यंदा जम्मू-काश्मीरमध्येही साजरा झाला भारताच्या विजयाचा जल्लोष; पहा व्हिडिओ)

या कारवाईत (ED Raid) जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील ७० ठिकाणांहून ही मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या या मालमत्तांची किंमत अंदाजे ३१५ कोटी रुपये आहे.

दरम्यान, ईडीने (ED Raid) यापूर्वी जळगाव येथील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या या दागिन्यांवर ऑगस्टमध्ये छापा टाकण्यात आला होता. यावेळी २४ तासांपेक्षा जास्त ईडीकडून चौकशी सुरु होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.