Sane Guruji Kathamala: साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीअखेर गोव्यात होणार

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी रोजी जांबावली (गोवा) येथे होणार आहे.

123
Sane Guruji Kathamala: साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीअखेर गोव्यात होणार
Sane Guruji Kathamala: साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीअखेर गोव्यात होणार

कथामालेचे हे ५६वे राष्ट्रीय अधिवेशन असून ते जांबवली येथील दामोदर संस्थानात भरणार आहे. अधिवेशनाचे आयोजन कथामालेसोबतच गोव्याचा कला आणि सांस्कृतिक विभाग तसेच गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेच्या (Sane Guruji Kathamala) संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष शामराव कराळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरणार असून गोव्याचे समाज कल्याण आणि पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष उत्तम फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजन गवस यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक संदीप निगळ्ये यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारले आहे.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ramlala Pranpratishtha : श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर वसईचा राजा मित्रमंडळाकडून शोभायात्रेचे आयोजन )

अधिवेशनात शोभायात्रा, गोमंतकीय लोकनृत्ये, तसेच विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकथन जीवनमूल्यांचा शोध, कथाकथन विविध कलांचे मूळ, कथाकथन भाषिक आवड आणि अभिरुची या तीन महत्त्वपूर्ण परिसंवादांचा त्यात समावेश आहे. साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनास कोकणातील कथामाला प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.