Ayodhya Shri Ramlala Pranpratishtha : वसईचा राजा मित्रमंडळाकडून शोभायात्रेचे आयोजन; तर पापडीतील राम मंदिराचा अनोखा उपक्रम

291

अयोध्येत ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Shri Ramlala Pranpratishtha) करण्यात आली. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार वसईतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वसईचा राजा मित्रमंडळाकडून वसईतील पारनाका ते राम मंदिरपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तर वसईच्या पापडीतील राम मंदिराकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला. त्यात बोरं विकणाऱ्या सगुणी चिंतामण नाडगे या आदिवासी महिलेचा सन्मान करण्यात आला.

(हेही वाचा Ayodhya Shri Ramlala Pratishtha : श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काय म्हणतात पाकिस्तानची प्रसारमाध्यमे?)

शोभायात्रेत सहभागी तरुणींकडून साहसी खेळाची प्रात्यक्षिके 

Ayodhya Shri Ramlala Pranpratishtha या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित या शोभायात्रेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वेषात तीन मुलांना रथामध्ये बसवण्यात आले होते. या शोभायात्रेत सहभागी तरुणींनी साहसी खेळाची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यात तलवारबाजी आणि लाठीकाठीची प्रात्यक्षिके करून दाखवली. ढोलताशा पथकाने या शोभायात्रेचे सर्वांचे लक्ष वेधले. या ढोल पथकामध्येही तरुणी सहभागी झाल्या होत्या, या शोभायात्रेत सर्व वयोगटातील रामभक्त पारंपरिक वेषामध्ये सहभागी झाले होते. दिवसभर यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाआरती, रामरक्षा पठण, दीपोत्सव, गीतरामायण यांचे आयोजन करण्यात आले होते.

बोरं विकणाऱ्या सगुणी चिंतामण नाडगे यांचा सन्मान

वसईतील पापडी गावातील राम मंदिराने अनोखा उपक्रम राबवला. त्यामध्ये मंदिर परिसरात बोरं विकणाऱ्या सगुणी चिंतामण नाडगे या आदिवासी महिलेचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले.

shabari

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.