Narendra Modi: पंतप्रधानांना गोविंददेव गिरींकडून ‘राजर्षी’ उपाधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

123
Narendra Modi: पंतप्रधानांना गोविंददेव गिरींकडून 'राजर्षी' उपाधी
Narendra Modi: पंतप्रधानांना गोविंददेव गिरींकडून 'राजर्षी' उपाधी

राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सोमवारी पंतप्रधानांनी उपवास सोडला. गेले ११ दिवस त्यांनी उपवास केला होता. पंतप्रधानांच्या प्रयत्नातूनच मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली. मोदींची (Narendra Modi) तपश्चर्य आणि अनुष्ठान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होते. पंतप्रधान ‘राजर्षी’ असल्याचे प्रतिपादन गोविंददेव गिरी महाराजांनी केले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. असा तपश्चर्या करणारा यापूर्वीचा राजा एकच केवळ छत्रपती शिवरायांनी यापूर्वी अशीच तपश्चर्या केली, असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : आमच्या तपस्येत कमी राहिली होती; पंतप्रधानांनी केली प्रभु श्रीरामाच्या चरणी क्षमायाचना)

नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक
पंतप्रधान मोदी यांना फक्त 3 दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी 11 दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपं नाही. असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही काही सामान्य बाब नाही, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा…
तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला सन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले, असे गोविंददेव गिरी म्हणाले. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं, असे म्हणत गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडून मोदींचे कौतुक करण्यात आले. गोविंदगिरी महाराजांकडून भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होताच गर्दीतून शिवरायांचा जयजयकार झाल्याचे दिसून आले.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.