Ayodhya Shri Ramlala Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्‌घाटन होताच मागाठाणेत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

प्रविण दरेकरांच्या उपस्थितीत नागरिकांनी एलईडी स्क्रीनवर पाहिला अयोध्येतील सोहळा

191
Ayodhya Shri Ramlala Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्‌घाटन होताच मागाठाणेत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा
Ayodhya Shri Ramlala Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्‌घाटन होताच मागाठाणेत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्‌घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. हा सोहळा पार पडताच मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा (BJP) विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते नागरिकांना लाडू वाटत, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Ayodhya Shri Ramlala Pratishtha)

संपूर्ण भारत ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण याची देही, याची डोळा अनुभवता यावा यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी आमदार दरेकर (Pravin Darekar) यांच्यातर्फे अशोकवन येथील साईबाबा मंदिरात भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लहान मुले राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होताच आमदार दरेकर (Pravin Darekar) यांच्यासह नागरिकांनी ‘जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय’, असा जयघोष केला. (Ayodhya Shri Ramlala Pratishtha)


(हेही वाचा – Balasaheb Thackeray Smriti Sthal : बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला स्मृती स्थळावर शिवसेनेची अशी आदरांजली)

तसेच नागरिकांना लाडू वाटत, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर दरेकरांच्या हस्ते साईबाबा मंदिरात आरतीही करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उदय आंबवकर, मंडल अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला मंडल अध्यक्षा रश्मी भोसले, कृष्णा दरेकर, शिवाजी चौगुले यांसह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ayodhya Shri Ramlala Pratishtha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.