हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करण्याच्या प्रकरणी जिहादी मुसलमान (Muslim) समीर सनदे ज्या गावात रहातो त्या शिरोली पुलाची गावात २८ एप्रिलला संतप्त पडसाद उमटले. सकाळी मोठ्या संख्येने एकत्र आलेले ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी कमानीपासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढला अन् संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी हा मोर्चा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर अडवला आणि मोर्चास अनुमती नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांना परत जाण्यास सांगितले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच पोलीस यांच्याच जोरदार वादावादी झाली. या प्रकरणाचा निषेध म्हणून गाव बंद ठेवण्यात आले होते. (Muslim)
(हेही वाचा SSC-HSC Result 2026 : निकाल, फोटो अन् अकरावी प्रवेश; यंदा बोर्डाचा नवा ‘गेमचेंजर’ प्लॅन तयार!)
या प्रकरणात जिहादी (Muslim) समीर सनदे याला साहाय्य करणारा त्याचा मित्र शाहरूख देसाई हा पसार असून त्यालाही तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘आम्हाला मोर्चासाठी अनुमती नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी रोखले; मात्र २ दिवसांत आम्ही अनुमती घेऊन परत मोर्चा काढणार आहोत. पोलीस आम्हाला मूक मोर्चा काढा असे सांगत आहेत; मात्र हिंदू आता शांत बसणार नाहीत. आमच्या माता-भगिनी यांच्यावर अत्याचार करणार्या धर्मांधांना गावातून हाकलून द्यावे, अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. पोलिसांनी ४ दिवसांत याचे सखोल अन्वेषण पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाई न केल्यास हिंदूंचा उद्रेक निश्चित आहे. (Muslim)
Join Our WhatsApp Community


