Mumbai-Pune Highway : कंटेनर पलटल्याने दोन दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू

50

मुंबई-पुणे राष्ट्रीय (Mumbai-Pune Highway) मार्गावर लोणावळा व खंडाळा दरम्यान असलेल्या एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या अपघातात एका लहान मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची अद्याप माहिती समोर आलेली नाही.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Pune Highway) अवजड वाहनांना दिवसभर जाण्यास बंदी असताना देखील शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक मोठा कंटेनर (एमएच ०४ जेयू ९४८८) जात होता. लोणावळा शहरातून जुन्या महामार्गाने पुढे गेल्यानंतर मयूर हॉटेल समोरील वळणावर सदरचा कंटेनर अचानक पलटी झाला व घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी गाड्यांना त्याची धडक बसली. या अपघातात एक लहान मुलगी व दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मूल व दोघेजण जखमी झाले आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले होते. तात्काळ जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून हा अपघात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा घडला झाला असावा अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा MMRDA : मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी सहज जाता येणार, एमएमआरडीएकडून बहुवाहतूक प्रकल्पाची अंमलबजावणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.