Virat Kohli : विराट कोहलीला वेगवान बाऊन्सर भीतीदायक वाटतो की यॉर्कर?

77
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ शेवटचा साखळी सामना आणि त्यानंतर उपान्त्य सामन्याची तयारी करत असताना विराट कोहलीचा (Virat Kohli) एक भन्नाट व्हीडिओ सध्या समोर आला आहे. यात त्याची पत्नी अनुष्का शर्माच त्याची मुलाखत घेत आहे. आणि तिच्या काही प्रश्नांना त्याने सरळ बॅटने उत्तरं दिली आहेत. बहुतेक सगळे प्रश्न हे रॅपि़ड फायर म्हणजेच लगेच उत्तरं देण्याचे आहेत.

एक प्रश्न अनुष्काने विचारला, तो म्हणजे, ‘ताशी १५० किमी वेगाने येणारा बाऊन्सर की, यॉर्कर, तू कशाला घाबरतोस?’ यावर विराटने ‘बाऊन्सर,’ असं उत्तर दिलं आहे. पण, हे उत्तर देताना विराटची शब्दश: वाक्य लक्षात घेण्यासारखी आहेत.तो म्हणतो, ‘तसं तर मी कशालाच घाबरत नाही. पण, एकच उत्तर द्यायचं झालं तर बाऊन्सर,’

(हेही वाचा India – USA : भारत-अमेरिकेत मंत्रीस्तरीय ‘टू प्लस टू’ चर्चा)

अनुष्काने विराटला क्रिकेटच्या व्यतिरिक्तही प्रश्न विचारले आहेत. रविवारचा वेळ घालवण्याची कल्पनाही विराटने सांगितली. ‘रविवार किंवा कुठलाही सुटीचा दिवस हा कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचा आणि शांतता अनुभवण्याचा दिवस आहे. मुलीबरोबर वेळ घालवण्याचा दिवस आहे. मी तिच्याशी खेळतो. कलरिंग करतो. आणि ती झोपायला गेली की, मग काहीतरी टीव्हीवर बघतो.’

विराटला (Virat Kohli) विश्वचषक स्पर्धा संपली की, दक्षिण आफ्रिकेत वाईल्डलाईफ सफारीवर जाण्याची इच्छा आहे. तर क्रिकेट व्यतिरिक्त त्याला फुटबॉल आवडतं. आणि रोनाल्डो हा त्याचा आवडता खेळाडू आहे. रोनाल्डो होता तोपर्यंत विराटला मॅनयु संघ आवडत होता. आता तो मॅन्चेस्टर सिटी संघाला फॉ़लो करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.