MSRTC : एसटीच्या चालक-वाहकांसाठी पहिले वातानुकूलित विश्रांतीगृह; मुंबई सेंट्रल आगारात काम सुरु

176

महाराष्ट्र वाहतूक भवन अर्थात मुंबई सेंट्रलमध्ये वातानुकूलित विश्रांतीगृहाचे काम सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यांत हे विश्रांतीगृह वापरासाठी खुले होणार आहे. चालक-वाहकांसाठी एसी विश्रांतीगृह असलेले मुंबई सेंट्रल हे राज्यातील पहिले आगार ठरणार आहे. ‘हिंदुहृद्यसम्राट  बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियांना’ अंतर्गत मुंबई सेंट्रल स्थानकात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मुंबई सेंट्रल आगारात पुरुष चालक-वाहकांसाठी एक विश्रामगृह आहे. यात १०० कर्मचारी विश्रांती घेतात. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह आहे.

(हेही वाचा विवाहबाह्य संबंध असलेल्या मुसलमानाने पत्नीला दिला Triple Talaq; पतीवर गुन्हा दाखल)

काँक्रिटीकरणासाठी साडेतीन कोटी

राज्यातील हे पहिले वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृह असणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रयत्नातून १९३ बस स्थानकांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यात मुंबई सेंट्रलमधील सुमारे २ हेक्टर जागेचा समावेश असून त्यासाठी ३ कोटी ५० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तिन्ही विश्रांतीगृहांत चालक-वाहकांना जमिनीवर विश्रांती घ्यावी लागत होती. विश्रांतीगृहांचे वातानुकूलिकरण करण्यासह टू-टियर बेडची ही व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे चालक-वाहकांना जमिनीवर विश्रांती घेण्याची गरज भासणार नाही. राज्यातून येणाऱ्या चालक-वाहकांसाठी सुमारे ५०० कर्मचारी सामावून घेणारी अशी एकूण तीन विश्रांतीगृहे मुंबई सेंट्रल येथे आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.